सिंधुदुर्गातील पत्रकारांचे सामाजिक योगदान मौल्यवान व आर्दशवत – किशोर तावडे

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळा

कणकवली ४ जानेवारी (भगवान लोके)

सिंधुदुर्गातील पत्रकारांचे सामाजिक योगदान आणि त्यांचे पत्रकारिता व्यक्तीरिक्तचे कार्य मौल्यवान व आर्दशवत आहे. विविध
उपक्रमांतून पत्रकारांचा एकोपा अधिकाधिक वाढावा यासाठी सुरु असलेले उपक्रमांचे कौतुक करावे तेवढेच आहे. कणकवली तालुका पत्रकार संघाचे हा स्नेहमेळावा म्हणजे एक चांगला सोहळा आहे. अशा उपक्रमांमुळे एक आदर्शवत कामाची निर्मिती होईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी व्यक्त केला.

कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे दिलेले जाणारे पत्रकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता या पुरस्कारांचा वितरण सोहळा व पत्रकारांचे स्नेहसंमेलन पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट गार्डन येथे आयोजित केले होते. याप्रसंगी श्री. तावडे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम
विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसरकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, माजी जिल्हाध्यक्ष संतोष वायंगणकर, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष राऊळ,
महेश सरनाईक, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे, उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, अनिकेत उचले, सहसचिव उत्तम सावंत, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, भगवान लोके,चंद्रशेखर देसाई,तुषार सावंत, सुधीर राणे,राजन चव्हाण, कार्यकारिणी सदस्य भास्कर रासम, उमेश बुचडे, तुषार हजारे, अस्मिता गिडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या माध्यमातून देश-विदेशात केंद्रस्थानी येत आहे. नौदलाचा दिन ही यासाठी महत्वाचा ठरला. राजकोट किल्ला हा पर्यटन स्थळ व अन्य उपक्रमांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रत्येक वेळी जिल्ह्यातील पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण ठरत आहे. जिल्हा व
तालुका पत्रकार संघांनी हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये वैविध्यपूर्णता आहे. निबंध स्पर्धा असो वा वृक्षलागवडीसारखे चळवळ जिल्ह्याच्या विकासात
प्रत्येकवेळी पत्रकारांचे पाऊल आश्‍वासक वाटते. कणकवली तालुका पत्रकार संघाचे हे उपक्रम असेच चालू राहावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम
विभागाचे कार्यकारी अभियंता
अजयकुमार सर्वगोड म्हणाले, बुद्धीप्रामाण्यवाद हा सिंधुदुर्गातील पत्रकारांकडून शिकावा. चांगल्या उपक्रमाला कोणत्याही स्थितीत पाठबळ द्यायचे तर कुणी चुकीच्या दिशेने जात असेल तर त्यांंचा मुलाहिजा ठेवायचा नाही, अशी पत्रकारिता पत्रकार मला भावतात. राजकोट किल्ला निर्मितीच्या
प्रसंगाचा किस्सा सांगतानाच कणकवली पत्रकार संघाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसरकर, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, माजी जिल्हाध्यक्ष संतोष वायंगणकर, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दिलीप हिंदळेकर, शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार राजेश सरकारे, अनिल सावंत ग्रामीण आदर्श पत्रकार पुरस्कार मिलिंद डोंगरे, यशस्वी उद्योजक पुरस्कार मुदस्सर शिरगांवकर, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार पंढरी उर्फ पिंट्या जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महिला विशेष सन्मान तन्वीर शिरगावकर यांचा करण्यात आला.
कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात
आले. चंद्रशेखर तांबट, चंद्रशेखर उपरकर, उदय दुधवडकर,माजी नगरसेवक शिशीर परुळेकर, संजय पेटकर, दिव्यश्री मारकड, तालुका पत्रकार संघाची क्रिकेट टीम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक करताना अजित सावंत यांनी पत्रकार संघाने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत आम्ही नेहमीच सामाजिक बांधलिकी जोपासली आहे. उत्कृष्ट पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांचा गौरव केला व समाजात चांगले काम करणार्‍या व्यक्तींची दखल घेत गौरव केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन भगवान लोके यांनी केले. आभार मानिक सावंत यांनी मानले. यावेळी पत्रकार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.