पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ते १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान महासंस्कृती महोत्सव’

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन पाच दिवस सांस्कृतिक मेजवानी प्रदर्शनीय दालनांचा समावेश

सिंधुदुर्ग, दि.०४ फेब्रुवारी

शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महासंस्कृती महोत्सव’ दि. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत संपूर्ण राज्यभर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘महासंस्कृती’ महोत्सवाचे आयोजन डॉ. स्वार हॉस्पीटल समोरील मैदान, सावंतवाडी येथे दि.६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. ह्या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ठीक ६ वाजता होणार आहे.

या महोत्सवाला केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, वैभव नाईक, नितेश राणे आणि विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेचे विविध प्रकार, सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रदर्शनीय कलादालन ज्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, पर्यटन विषयक दालन, कृषिविषयक उत्पादन दालन, हस्तकला प्रदर्शन (बांबुकाम) दालन, बचत गट पदार्थ व उत्पादन दालन, आपत्ती विषयक दालनांचा समावेश असणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमः (वेळ सायं. ६ ते रात्री १० पर्यंत)

६ फेब्रुवारी – महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी

७ फेब्रुवारी- जल्लोष सिंधुदुर्ग

८ फेब्रुवारी- महानाट्य शिवबा

९ फेब्रुवारी – मराठी बाणा

१० फेब्रुवारी – अवधूत गुप्ते संगीत रजनी

तरी या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे