सावंतवाडी, दि.०४ फेब्रुवारी
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या सी. एस.आर.फंडातून आणि अनार्डे फाउंडेशन माहीम, मुंबई यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हडपीड येथे पहिल्या वहिल्या जलशुद्धिकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा झाला.
या कार्यक्रमास बी.पी.सी.एल.च्या अधिकारी संध्या बागवे (कदम), प्रोजेक्ट हेड राजन धुलिया, स्टेक होल्डर मॉनेजमेंट एच. आर. अनार्डे फाऊंडेशनचे व्हाइस प्रेसिडेंट सुरेश मोहिते, विजय, राकेश गायकवाड, हडपिडच्या सरपंच संध्या राणे, श्री आकारी ब्राह्मण सेवा समिती, हडपिड मुंबईचे अध्यक्ष अनिल राणे, आकारी ब्राह्मण सेवा समिती, हडपिड मुंबईचे चिटणीस दयानंद राणे तसेच हडपिड गावातील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
गावाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश राणे आणि प्रास्ताविक अनु राणे यांनी केले. तसेच सर्व ग्रामस्थांची भोजन व्यवस्था गावाच्या महिला मंडळींनी चौकेकर दाम्पत्याच्या निवासस्थानी केली. ग्रामस्थ आणि मुंबईकर यांनी खूप मोलाचे योगदान दिले.