श्रीराम वाचन मंदिर केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांना पी. एच. डी. प्रदान

सावंतवाडी, दि.०४ फेब्रुवारी
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी या पदव्युत्तर पदवी (ग्रंथालय व व माहितीशास्त्र) श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी या केंद्रावर उत्तम गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेले अनुक्रमे श्री. परितोष पवार, श्री. जे. पी. जगताप आणि सौ. रुपा कामत या तिनही विद्यार्थ्यांनी पी. एच्. डी. करिता सादर केलेले शोध प्रबंध मान्य होऊन या आठवड्यात त्यांनी पी. एच्. डी. पदवी उत्तमरित्या प्राप्त केल्याचे जाहीर करण्यात
आले.
या विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध अनुक्रमे – डॉ. परितोष पवार – इन्होव्हेटिव्ह टेक्नीक इन बॉम्बे सब अर्बन कॉलेजीस इन मुंबई सीजब्बर व डॉ. जगताप जे. पी. – सेंच्युरी ओल्ड पब्लीक लायब्रीज इन रत्नागिरी, पालघर, ठाणे जिल्हे : एक चिकित्सक अभ्यास.तर सौ. विजया कामत: इनफरमेशन सीकोग, उनीहीअर ऑफ मेडमिल (बिहेव्हीअर ऑफ मेडीकल सायन्सन्स्टुडन्टस इन गोत्रो या विषयावर सादर केलेले होतें. या तीन विद्यार्थ्यांनी अंतीम सादरीकरण यशस्वीरित्या पार पडून त्यांना पी. एच्. डी. ही पदवी प्रदान करण्यात आली आहे

या तीनही विद्यार्थ्यांना श्रीराम वाचन मंदिराचे उपकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या विद्यार्थ्यांनी डॉ. बुवा यांचे सह नॅशनल व इंटरनॅशनल परिषदातून शोध निबंध उत्तमरित्या सादर केले असून हे शोध निबंध प्रकाशित ही झाले आहेत.
श्रीराम वाचन मंदिराच्या सर्व पदाधिका-यास याचा सार्थ अभिमान वाटत असून या तिघांचे विशेष कौतुक अध्यक्ष श्री. प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, सचीव श्री. रमेश बोंद्रे, व इतर सर्व सदस्यांनी केले आहे.