आमचे दिवस आल्यावर सारे व्याजासह, व्याजासह नव्हे तर चक्रवाढ व्याजासह परतफेड करू..

मी कोणाच्याही विरोधात नाही मात्र हुकूमशाह, खोटारडेपणा यांचा मी विरोधक-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सावंतवाडी दि.४ फेब्रुवारी
इडी,सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास दिला जात आहे. पक्ष फोडले जात आहेत त्यामुळे आमचे दिवस आल्यावर सारे व्याजासह, व्याजासह नव्हे तर चक्रवाढ व्याजासह परतफेड करू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी येथील जन संवाद सभेत दिला.मी कोणाच्याही विरोधात नाही मात्र हुकूमशाह, खोटारडेपणा यांचा मी विरोधक आहे असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री दिपक केसरकर यांचाही समाचार ठाकरे शैलीत घेतला.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संवाद सभा गांधी चौक सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सौ रश्मी ठाकरे उपस्थित होत्या पण सभागृहात त्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव,आमदार वैभव नाईक, आमदार रमेश गावकर,वरूण सरदेसाई,अरूण दुधवडकर, संजय पडते,गौरीशंकर खोत,शैलेश परब, जान्हवी सावंत,रूपेश राऊळ,दत्ता दळवी,संदेश पारकर, सतिश सावंत,राजू नाईक, बाळा गावडे , सुशांत नाईक, शिवानी परब,मायकल डिसोझा, रमेश गावकर, यशवंत परब, बाबुराव धुरी, अशोक परब, राजू मुळीक, मंदार शिरसाट, सुनील गावडे, संजय गवस, वर्षा कासार, आबा सावंत, अतुल रावराणे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सावंतवाडीच्या गांधी चौकात दुपारच्या भर उन्हात त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला .यावेळी शिवसैनिकांनी देखील मोठ्या उत्साहात या भर उन्हात उपस्थित राहून उद्धव ठाकरे यांचे स्वागत करून विचार ऐकले.अधून मधून प्रतिसाद दिला.उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री असताना मी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे आजचा हा जनसंवाद नव्हे तर कुटुंब संवाद आहे मी कोंबडी वडे बोलू शकतो. पण माझे तोंड मी खराब करणार नाही तुम्ही लोकांनी अशा भेकड्यांना धडा शिकवलेला आहे असे त्यांनी जिल्ह्यातील गद्दारांना संबोधले. तुम्ही मला मुख्यमंत्री म्हणून कुटुंबाचा सदस्य मानला मी मन की बात नाही तर दिल की बात बोलणारा माणूस आहे. आमच्या हृदयात राम आणि हाताला काम असे आमचे विचार आहेत.
ते म्हणाले,चांदा ते बांदा म्हणणार नाही तर मी बांधापासून चांद्यापर्यंत आता जाणार आहे. शिवसेना कोणाची ती बघतो असे शिवसेना पळवणाऱ्यांना त्यांनी टोले हाणले. दीपक केसरकर यांना आमदार, सत्तेची मंत्री पदाची खुर्ची दिली. त्यांनी फक्त खुर्ची उगवली पण विकास काही केला नाही आणि हा गद्दार निघाला. आता हे गद्दरकीचे पडलेले नाव आयुष्यात गद्दार पुसू शकणार नाही असे त्यांनी मिंधे गटाच्या सर्व गद्दारांना संबोधले. साईबाबांच्या दर्शनासाठी जाणारा श्रद्धा आणि सबुरी मानतो असे आम्हाला वाटले म्हणून आम्ही दोन वेळा याला आमदार केले पहिल्या वेळी मंत्रि केले पण तो गद्दार निघाला केसरकर कधी इमानदार होऊ शकत नाही. गद्दारी नसानसात भिनलेली आहे असे त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना म्हटले आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, परवा गोळीबार झाला, कुणी केला हे सारे समोर आलेले आहे. कोकणाला सुद्धा शिवसेनाप्रमुखांनी गुंडगिरी पासून वाचवलं गुंडशाही कशी संपवली हे तुम्ही जाणता.खासदार विनायक राऊत या ठिकाणी निवडून आले नसते तर गुंडशाही वाढत गेली असती असा टोलाही त्यांनी हाणला .कोकणात गुन्हेगारीचा सुपडा साफ केला आणि जिल्ह्यातील खासदार व आमदारकीला देखील लोकांनी नाकारले आता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ, त्याच्यानंतर शेजारचा मतदारसंघ आणि वैभव नाईक यांच्या मतदारसंघातून देखील या साऱ्यांना नाकारले पाहिजे. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाही यांनी त्यांना यापूर्वी निवडणुकीमध्ये आपला दम दाखवलेला आहे आता यापुढे तुझी जागरूक राहून काम केले पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.
गणपत गायकवाड यांनी गोळीबार नेमका कशासाठी केला ,हे महत्त्वाचे आहे गायकवाड ने आपण गोळीबार केल्याचे सांगितले तरीही सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले लबाड मिंधे गटाने शिवसेनेच्या बैठकीतील चित्रीकरण मात्र दाखविले नाही. गणपती गायकवाडांनी मुख्यमंत्री आणि त्याच्या मुलाच्या विरोधात टीका केली. मुख्यमंत्री मिंधे हेच यापुढे राहिले तर गुंडांची फौज तयार करतील असे म्हटले आहे. मिंधे कडे करोडो रुपये आहेत असे जाहीर टीका करतात त्यामुळे आता मिंधे गट आणि भाजप यांच्यातील हे मतभेद समोर आले आहेत. आता मोदी गॅरंटी कोणाला मिळणार हे पहावे लागेल असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ठाकरे म्हणाले, गतकाळातील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार करून आम्ही त्यांना विजयी केले.आमच्या खासदारांनी पाठिंबा दर्शवला तरीही त्यांनी विनाकारण आमच्या लोकांवर पोलीस सीबीआय इन्कम टॅक्स कारवाई ,पक्ष फोडले अशा विविध कारणे कारवाई केली मात्र यापुढे आमचेही दिवस येतील तेव्हा व्याजासह नव्हे तर चक्रवाढ व्याजासह आम्ही परतफेड करू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेडिकल कॉलेज आहेत .त्या दोन्ही मेडिकल कॉलेजला मी राज्य सरकारची परवानगी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी आम्ही प्रयत्न चालवले पण त्याला दुसऱ्या मेडिकल कॉलेज वाल्याने विरोध केला मी मुख्यमंत्री असताना विरोधकांची कामे केली असे ठाकरे यांनी सांगितले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विरोध करून काडीचाही उपयोग झाला नाही केंद्र राज्यात आम्ही पाठपुरावा केल्यामुळे ते झाले असे ते म्हणाले.
ठाकरे म्हणाले ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता शांततेचा काळ आहे. पुर्वी गुंडागर्दी झाली होती त्यावेळी कै. श्रीधर नाईक ,कै.सत्यविजय भिसे ,रमेश गोवेकर यांचे काय झाले हे जनतेला माहिती आहे अशा काळात तुम्ही लोकांनी त्यांना चिरडले. गुंडागर्दी काबुत आणली.त्यामुळे पुढील काळात देखील हुकूमशाह खोटारड्या माणसांना तुम्ही जागावर बसवा असं आवाहन त्यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पाणबुडी प्रकल्प नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळेल अशी अपेक्षा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणात मालवण मध्ये नौदल दिन साजरा केला.समाधान वाटले मात्र ते चक्रीवादळ निसर्ग वादळ तौक्ते वादळ अशा संकटामध्ये फिरकले नाही महाराष्ट्राला निधी दिला नाही महाराष्ट्र पुन्हा उभारावा म्हणून प्रयत्न केला नाही मात्र महाराष्ट्र उभा राहिला तर मालवण नौदल दिनानिमित्त पंतप्रधान आले आणि त्यांनी पाणबुडी प्रकल्प गुजरातला घेऊन गेले आम्हाला भीती वाटते महाराष्ट्रातील वारंवार येत आहे ज्या भागात जातील त्या भागात चांगलं दिसणारं ते गुजरातला घेऊन जातील ही आमच्या मनात भीती आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
आता सर्वे सर्व माय भगिनी नागरिकांनी गावागावात वाडी रस्त्यावर जावे आणि तेथे होऊन जाऊ दे चर्चा असा कार्यक्रम घ्यायला पाहिजे शेतकरी तरुण महिला गोरगरीब लोक यांना काय मिळाले याची चर्चा व्हायला पाहिजे पीक पाणी विमा आंबा काजू नुकसान भरपाई मिळते का ?पाहायला पाहिजे यावर चर्चा व्हायला पाहिजे दुष्काळाच्या दिवसांमध्ये काय मदत केली हेही जनतेला समजून सांगितले पाहिजे मी मुख्यमंत्री असताना सारी मदत दिली मात्र पंधरा लाख रुपये येणार होते ते काय झाले जनधन योजना उज्वला योजना पंतप्रधान निधी जलजीवन योजना अशा सर्व योजनांचा फायदा लोकांना मिळाला का याची पण चर्चा व्हायला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.

फक्त राज्यात मिंधे आणि भाजपची गॅंग निर्माण झाली असून तिसरी गॅंग अजून दिसत नाही ते ७० हजार कोटीच्या भ्रष्टाचारात बुडाले असतील असा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षावर टोला हाणला.राज्यात सत्ताधारी मध्ये गॅंगवर होत असतील तर पुढचा २६ जानेवारी दिसणार की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपात पुन्हा येईन म्हणणारे पाव उपमुख्यमंत्री झाले पण ते मुख्यमंत्री झाले नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर हाणला .शिवसेना संपण्याच्या नादात त्यांनी भाजप संपवला हिंदुत्वाच्या भगव्याला आग लावली आमचे हिंदुत्व घरोघरी चूल पेटवणार आहे त्यांचे तसे आहे का? होय मी वडिलोपार्जित शिवसेना पक्ष घेऊन पुढे चालत आहे त्याला तुम्ही घराणेशाही म्हणत असाल तर म्हणा असे उद्धव ठाकरे यांनी सांगून विरोधकावर टीका केली. आज रविवार आहे कोंबडीवाल्यांचा वार आहे असा त्यांनी टोला हाणला. आमच्या सभेला खुर्च्या नसल्या तरी लोक उभे राहतात पण त्यांच्या सभांना खुर्च्यात माणसं नसतात असे त्यांनी सांगून आम्ही भाड्याने माणसं आणत नाहीत तर आमची माणसंही आपुलकीने रक्ताच्या नात्याने येत असतात असे उध्दव ठाकरे म्हणाले.

खासदार विनायक राऊत, सावंतवाडी मध्ये आमदार, मंत्री पद दिले तरी गद्दार निघाले. केसरकर यांना मोठं करूनही खुर्ची उबवली. शासकीय महाविद्यालय उध्दव ठाकरे यांच्या मुळे सूरु झाली तीनशे विद्यार्थी संख्या आहे.

आमदार वैभव नाईक, शिवसेना चोरली. हि लढाई महाराष्ट्र विरूद्ध गुजरात झाली आहे.सर्व उद्योग व्यापार गुजरात मध्ये पळवले जात आहेत. इडी चा धाक दाखवून तोडफोड करुन पक्ष, मुख्यमंत्री फोडले जात आहेत. मात्र उध्दव ठाकरे यांच्या वर दबाव येऊनही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री निधी दिला जात नाही तेच दिपक केसरकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. जनतेने भुलभवैया चालू आहे. दिल्ली वर शिवसेना महाविकास आघाडीचा झेंडा फडकावचा आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी चौफेर समाचार घेतला.गौरीशंकर खोत म्हणाले, शिंदे – फडणवीस यांचे पोलिस संरक्षण करु शकतील असे सांगता येत नाही. पिस्तुल असलेले सांगताहेत आमचा बाप देवगिरी वर बसला आहे. भाजप ने वाॅशिंग मशीन लावली आहे. इथले लोकप्रतिनिधींची मालमत्ता वाढली.