स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी अभिवादन मान्यवरांकडून आदरांजली : स्मृतींना उजाळा

सावंतवाडी, दि.०४ फेब्रुवारी
महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री स्व. भाईसाहेब सावंत यांची १०० वी जयंती त्यांच्या
माजगाव येथील समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून साजरी करण्यात आली. कै. भाईसाहेब यांचे सुपुत्र विकासभाई सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
यावेळी भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, सदस्य अमोल सावंत, डॉ. अर्चना अमोल सावंत, भाईसाहेब यांचे पणतू कबीर सावंत, सतीश बागवे, प्रा. बाळासाहेब नंदीहळळी, मुख्याध्यापक जगदीश धोंड, प्रा. नारायण देवरकर, उप प्राचार्य डॉ. सुमेधा नाईक,उपमुख्याध्यापक प्रल्हाद सावंत,प्रा. प्रवीण बांदेकर, दोडामार्ग हायस्कूलचे मुख्याध्यापक अरविंद साळगावकर, चौकुळ हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एन. पाटील,आरपीडी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी एस पाटील, के टी परब, दोडामार्ग हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शैलेश नाईक, आर. व्ही बोडके, संदीप सुकी, संजय कानसे, मनोहर वेंगुर्लेकर, धिरेंद्र होळीकर तसेच भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सर्व संस्थांचे पदाधिकारी शाळांचे आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक आदी उपस्थित होते.