गोळवण शाळेस संगणक संच भेट! सत्यवान नाईक यांचे दातृत्व

मसुरे,दि.०४ फेब्रुवारी(झुंजार पेडणेकर)

शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये संगणकाचे महत्व ओळखून गोळवण गावातील ग्रामस्थ श्री सत्यवान अनाजी नाईक यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नंबर एक प्रशालेस संगणक भेट दिली. त्यावेळी उपसरपंच श्री. साबाजी गावडे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सौ. मिताली परब ग्रामसेवक सौ. कामतेकर मॅडम,ग्रामस्थ नंदादीप नाईक, बाळाराम परब, करुणा राणे, रामकृष्ण नाईक, संदेश पवार,शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष पाताडे, पदवीधर शिक्षक श्री. संजय परुळेकर, उपस्थित होते.