सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2024 चे औपचारिक उद्घाटन

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजन

कणकवली दि.४ फेब्रुवारी(भगवान लोके)
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2024 चे औपचारिक उद्घाटन आज 4 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्य परीक्षा केंद्र कणकवली कॉलेज,कणकवली येथे जिल्हा पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, आणि जिल्हा माहिती अधिकारी
मुकुंद चिलवंत
याच्या शुभ हस्ते झाले.

यावेळी पत्रकार विरेंद्र चिंदरकर, कणकवली कॉलेज प्राचार्य श्री. महालिंगे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , संजना संदेश सावंत,शिक्षक संघटना पदाधिकारी गिल्बर्ट फर्नांडिस, सुहास सावंत, विनायक जाधव, प्रदीप मांजरेकर
केंद्रप्रमुख विजय भोगले, उत्तम सूर्यवंशी, संतोष जाधव, शिवजी पवार, सुरेश हरकुलकर आणि शिक्षण प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आयोजनाबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

विमानप्रवास, ISRO व गोवा सायन्स सेंटर भेटीसह अडीज लाखाची रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र बक्षीस स्वरूपात असलेल्या या परिक्षेचे हे ७ वे वर्ष असून सिधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार असून १० हजार ४६७ विद्यार्थ्यानी नोंदणी केली आहे.
या परीक्षेचे मुख्य परीक्षा केंद्रे – कणकवली कॉलेज, कणकवली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली.सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२४ चा निकाल संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे ३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात येईल.
उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच . त्याच प्रमाणे *निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.
यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी , पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षा यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा सौ संजना संदेश सावंत यांनी आभार मानले .

अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख श्री. सुशांत सुभाष मर्गज(९४२०२०६३२६)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

.