विजयासहित वाजत गाजत आंगणे वाडी येथे देवी भराडी मातेच्या दर्शनाला पुन्हा येणार….. उद्धव ठाकरे

मसुरे,दि.४ फेब्रुवारी
दडप शाही आणि अराजकता माजलेले हे शासन उलथवून टाकण्याची देवी आम्हाला शक्ती दे. या नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तक्तावरती विजयी होऊन या सर्वांना वाजत गाजत जगत जननी आई भराडी मातेच्या दर्शनाला आंगणेवडी येथे घेऊन येईन असे प्रतिपादन आंगणेवाडी येथे श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनानंतर बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपर्क अभियान निमित्त दौऱ्यावरती आले असून रविवारी संध्याकाळी उशिरा त्यांनी आंगणेवाडी येथील नवसाला पावणाऱ्या श्रीदेवी भराडी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी आंगणे कुटुंबीयांच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्यासाठी गाऱ्हाणे घालून त्यांना सुयश लाभण्यासाठी देवीकडे मागणे मागितले. या नंतर आंगणे कुटुंबीयांच्या वतीने एल अँड टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युनिटचे सुधाकर आंगणे यांनी उद्धव ठाकरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच आंगणेवाडीतील युवकांच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा सपत्नीक पुष्पहार घालून हृदय सत्कार केला. तसेच मसूरे विभागाच्या वतीने ही उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सौभाग्यवती रश्मीताई ठाकरे, विशाखा राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख संजय पडते, शशिकांत आगणे, अर्जुन आंगणे, सुनील आंगणे,
मुंबई माजी नगरसेवक सदा परब माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, संदीप हडकर, राजेश गावकर, सुहास पेडणेकर, पंकज वर्दम, दिनेश परब, सुरेखा वायंगणकर, नरेश सावंत, राघवेंद्र मुळीक, रिया आंगणे, मामा पेडणेकर, हरी खोबरेकर, आबा आंगणे, जयवंत आंगणे, तुषार आगणे, तनुराज आंगणे, प्रथमेश आंगणे, सुभाष आंगणे, पंकज आंगणे, सचिन आंगणे, देवेंद्र आंगणे, प्रतीक आंगणे, गणेश आंगणे, संतोष आगणे, प्रसाद आंगणे, चंद्रशेखर आंगणे, समीर आगणे, नंदकुमार आंगणे, श्रीकृष्ण आगणे, सुभाष आंगणे, प्रसाद आंगणे, तनुराज आंगणे गौरेश आंगणे, बाबू आंगणे, विठ्ठल आगणे, रामदास आंगणे, केशव आंगणे, आयवान फर्नांडिस, विजय पालव, सतीश आंगणे, राहुल सावंत, अमित भोगले, मामा पेडणेकर, राजू मालवणकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी, आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी मानले.