भाजपाने काही जणांना भुंकण्यासाठी नेमले,त्यातील एक कणकवलीतील

खा.विनायक राऊत यांची राणे पिता पुत्रावर जोरदार टीका..

कणकवली दि.४ फेब्रुवारी(भगवान लोके)

भाजपाने काही जणांना भुंकण्यासाठी नेमलेल्या लोकांमध्ये एकजण कणकवलीत आहे.रोज उठून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत आहे.या राणेंनी लोकांना लुबाडले आहे. नारायण राणेंनी मंत्रिपदाचा उपयोग कोकणासाठी केला नाही.शासकीय मेडिकल कॉलेज होताना अनेक अडथळे आणले.शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये मोफत प्रवेश असल्याने गरीब मुले डॉक्टर होवू शकतात.पण तोच प्रवेश राणेंच्या मेडिकल कॉलेज मध्ये घेण्यासाठी १ कोटी मोजावे लागतात,अशी टीका खा.विनायक राऊत यांनी केली.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खासदार विनायक राऊत बोलत होते.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,शिवसेना नेते आ.भास्कर जाधव,उपनेते गौरीशंकर खोत,आ.वैभव नाईक,युवा सेना सरचिटणीस वरूण सरदेसाई, संपर्क प्रमुख
अरुण दुधवडकर,नेते मिलिंद नार्वेकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,विधानसभा प्रमुख सतीश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,
अतुल रावराणे,उपजिल्हाप्रमुख संदीप कदम,महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत,मंदार शिरसाट आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना नेते आ.भास्कर जाधव म्हणाले, मी कोंबडी वर बोललो,सुष्म, लघु वर बोललो.हा नाऱ्या पदासाठी दारोदार भिक मागत फिरेल,हा बाळासाहेब ठाकरे यांचे शाप आहेत.त्यावेळी मला मंत्री असताना बाळासाहेब बोलले होते,तसच आज घडत आहे.शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी,नागोबा दुसरा मुख्यमंत्री झाला. मग ,उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर काय चुकले?तुम्हाला वाईट का वाटले?जोपर्यंत सन्मानाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसवत नाही,तोपर्यंत शांत बसायचे नाही.चंगू मंगु राणेंचे आहेत,ते नेपाळी आहेत.मी शिवसेना सोडली,जर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने बद्दल एकही वाईट शब्द बोललो तर दाखवावा,राजकारण सोडेन.शिवसेना संपविण्यासाठी भाजप पक्ष कट करीत आहे.नारायण राणे विधानसभेत भाजप हा गुंडाचा पक्ष बोलले ते रेकॉर्ड वर आहे.भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केला,हा भाजप पक्ष आहे.नेपाळी वाचमन पासून धमकी देणारी गुंड माणसे आहेत,मग जुनी भाजपची मंडळी कुठे? हे भाजपा ने जाहीर करावे.भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला.