आमचा भगवा काय असतो हे येणार्या लोकसभा निवडणुकीत लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवूच-पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
मालवण,दि.४ फेब्रुवारी
मालवण,दि.४ फेब्रुवारी
मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न माझे कधीच नव्हते परंतु ज्या गद्दारांनी आपले सरकार पाडले त्यांच्या नाकावर टिचून या राज्यात शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री विराजमान करून दाखविणारच अशी गर्जना करीत ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपने भगव्यामध्ये छेद करण्याच पाप केल आहे. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे त्या भगव्याला डाग लावलात तो भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, आमचा भगवा काय असतो हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवूच असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. हा निर्धार व्यक्त करतानाच त्यांनी मालवणच्या पद्मगडावर किंवा धोनताऱ्यावर मायनाक भंडारी चे स्मारक उभारू अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
जन संवाद यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मालवणला भेट दिली. या भेटी दरम्यान मालवण बंदर जेटीवर आयोजित करण्यात आलेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बोलत होते. तत्पूर्वी मालवण देऊळवाडा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद…. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे… उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो…. कोण आला रे… कोण आला शिवसेनेचा वाघ आला या आणि अशा प्रकारच्या घोषणा देत सारा आसमंत दणानून सोडतानाच मोटारसायकल रॅली काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांनी दणक्यात स्वागत केले. मालवण भरड नाका येथेही पुष्पवृष्टी करीत उद्धव ठाकरे यांचे जल्लोशी स्वागत करण्यात आले. या स्वागताचा स्वीकार करून उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याकडे प्रस्तान केले. किल्ले सिंधुदुर्गवरही उद्धव ठाकरे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, आमदार रमेश गावकर, वरुण सरदेसाई, अरुण दूधवडकर, अरविंद रावराणे, जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, संग्राम प्रभुगावकर, मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, पराग नार्वेकर, बाळा महाभोज, बाबा सावंत, पंकज वर्दम, भगवान लुडबे, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, बाबी जोगी, सेजल परब, सन्मेष परब, दर्शना कासवकर, भाई कासवकर, अंजना सामंत, सिद्धेश मांजरेकर, अमेय देसाई, पूनम चव्हाण, मनोज मोंडकर, बंडू चव्हाण, उमेश चव्हाण, समीर लब्दे, तपस्वी मयेकर, तृप्ती मयेकर, किरण वाळके, यशवंत गावकर आदी व इतर उपस्थित होते.