ओरोस येथे उद्या’शिक्षकांसाठी सानेगुरुजी’ व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन

मालवण,दि. ५ डिसेंबर

शिक्षक भारती सिंधुदुर्ग (प्राथमिक/माध्यमिक) आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षकांसाठी सानेगुरुजी” या विशेष व्याख्यानाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी मर्यादित सभागृह, सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथे शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी १०. ३० वा. करण्यात आले आहे.

या व्याख्यान कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, व्याख्याते व साने गुरुजींच्या विचारांचे अनुयायी, कृतिशील समाजवादी नेते प्रा. डॉ. हेरंब कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या व्याख्यानास शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष संतोष पाताडे, माध्यमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष संजय वेतुरेकर, बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.