आनंदवाडी बंदर जेटीचे काम अतिशय मंद गतीने सुरू…

प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन-प्रदेश फिशरमेन जिल्हाध्यक्ष उल्हास मणचेकर

देवगड, दि.५ फेब्रुवारी
येथील आनंदवाडी बंदर जेटीचे काम अतिशय मंद गतीने सुरू असून शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी या प्रकल्पावर खर्च होत आहे. परंतु या कामात अपेक्षित प्रगती मागील ७ ते ८ वर्षात दिसून येत नाही. याकडे तातडीने लक्ष घालून या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सचिव व महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उल्हास मणचेकर , देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी संयुक्त पत्राद्वारे अभियंता महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मुंबई यांना दिला आहे.
पत्रा नमूद केल्याप्रमाणे प्रकल्पाचे काम गेली ७ ते ८ वर्षे सुरू असून अतिशय मंद गतीने हे काम सुरू आहे .प्रारंभीच्या काळात या प्रकल्पाच्या भरावाचे काम पूर्ण करण्यात आले असे दिसत असले तरी त्यानंतर संबंधित मक्तेदार याने हे काम सोडून दिले व दुसरी एजन्सी नेमण्यात आली मागील दोन वर्षात या एजन्सी मार्फत या बंदर जेटीच्या कामात सुरुवात झाली पण अपेक्षित अशा कामाची प्रगती झालेली आढळून येत नाही कोणत्याही पद्धतीचे आधुनिक सामग्री मनुष्यबळ या एजन्सीकडे आढळून येत नसून अतिशय मंद गतीने हे काम सुरू आहे या तातडीने लक्ष घालावे व या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या देण्यात आला आहे.