तारा स्पोर्ट्स क्रिकेट स्पर्धेत महापुरुष रेवतळे मालवण विजेता!

ब्राम्हणदेव आचरा उपविजेता !महिला संघात स्टार गर्ल देवगड विजेता,ड्रीम गर्ल संघ उपविजेता!

देवगड, दि.५ फेब्रुवारी (दयानंद मांगले)
तारा स्पोर्ट्स तारामुंबरी आयोजित ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत महापुरुष रेवतळे मालवण या संघाने प्रथम क्रमांकाचे रोख रुपये ३० हजार आकर्षक चषक पटकाविला .तर उपविजेता ब्राम्हणदेव आचरा या संघाने रोख रुपये १५ हजार व आकर्षक चषकाचा मानकरी ठरला.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण महिला क्रिकेट संघात स्टार गर्ल देवगड या संघाने प्रथम क्रमांक मिळविला उपविजेता ड्रीम गर्ल देवगड या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले या स्पर्धेतील व तृतीय क्रमांक कुणकेश्वर पॅकर्स व चतुर्थ क्रमांक तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी याने मिळविला. त्यांना रोख रु ५ हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मालिकावीर बहुमान ब्राम्हणदेव आचरा संघाच्या दर्पण आचरेकर याने प्राप्त करून ५ सामन्यांमध्ये १७७ धावा आणि ६ गडी बाद करण्याचा त्याने मान मिळविला होता. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज महापुरुष रेवतळे संघाचा पायस आलमेडा यांना निवडण्यात आले. तसेच उत्कृष्ठ फलंदाज चा मानकरी महापुरुष रेवतळे मालवण संघाचा सुनील मालवणकर ठरला. अंतिम सामन्यातील सामनावीर सुनील मालवणकर या खेळाडूला याला गौरविण्यात आले. तसेच शिस्तबंद संघाचे पारितोषिक स्टार इलेव्हन मसुरे या संघाला देण्यात आले.
या स्पर्धेचे विशेष प्रायोजक इंडियन ऑइल व विशेष पारितोषिके श्री खवळे महागणपती यांनी प्रायोजित केली होती.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजवलन करून प्रास्तविक मान्यवर पाहुणे पंच,समालोचक,गुणलेखक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार पार पडला या पारितोषिक वितरण सोहळ्यास इंडियन ऑईलचे विक्री प्रबंधक दिनेश कुमावत,प्रणय रिअल इस्टेट सातारा चे कृष्णात साळुंखे,तारामुंबरी संस्था चेअरमन विनायक प्रभु,व्यवस्थापक प्रदीप मुणगेकर,माजी व्यवस्थापक अरुण तोरस्कर,स्टेट बँक देवगड उपव्यस्थापक आशय मेस्त्री,सौ सुप्रिया धुरत, खवळे महागणपती विश्वस्त अक्षय खवळे,निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मारुती मणचेकर,तारामुंबरी जिर्णोद्धार समिती अध्यक्ष मंगेश कुबल,अध्यक्ष सुजय धुरत,सागर पोलीस उपनिरीक्षक गणपत दरवेस,भाजप युवा मोर्चा देवगड शहर अध्यक्ष दयानंद पाटील,महादेव आचरेकर,जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर दयानंद मांगले,टी सी सी माजीं खेळाडू सुनील कांदळगावकर,शिवाजी कांदळगावकर,सूर्यकांत जोशी,चंद्रशेखर पराडकर,रोहन खवळे,यश रानडे,प्रवीण सावंत रामदास चोपडेकर,मकरंद लाड वैशाली तोडणकर,सुत्रसंचलन मिलिंद कुबल देवा परब यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तारा स्पोर्ट्स चे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.