वेंगुर्ले,दि.०६ डिसेंबर
आरवली (ता. वेंगुर्ले) गावचे ज्येष्ठ रहिवासी तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष महादेव अनंत फटनाईक (७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी, पुतणे, पुतण्या, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कै. महादेव फटनाईक गुरुजी यांनी १९६८ साली रत्नागिरी जिल्ह्यातील वडदसोल (ता. राजापूर) गावातील प्राथमिक शाळेमधून शिक्षकी पेशाला सुरुवात केली. डिसेंबर २००६ मध्ये मळगाव (ता. सावंतवाडी) मधून केंद्रप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले. फटनाईक हे आदर्श- संयमी, मनमिळावू आणि इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असणारे शिक्षक होते. आरवलीतील रहिवासी प्रसाद फटनाईक यांचे वडील तसेच सामाजिक कार्यकर्ते यशवंत तथा बाळू फटनाईक यांचे बंधू होत.