सावंतवाडी,दि.०६ डिसेंबर
कोलगाव- निरुखे येथील रहिवासी मंगेश गोविंद मेस्त्री (६८) यांचे मंगळवार ३ डिसेंबरला रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते सुतार कारागिर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, तीन भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. मुंबईस्थित संदीप मेस्त्री यांचे ते वडील तर सुतार कारागिर प्रकाश आणि अनंत मेस्त्री तसेच मुंबईस्थित आत्माराम मेस्त्री यांचे ते भाऊ होत.