अवैधरित्या गुरांची वाहतूक प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

कणकवली, दि.६ डिसेंबर
अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला वाहनचालक आदम अली इसफ नेर्सेकर (34, रा. आजरा, कोल्हापूर) त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे, सावंतवाडीहून मुंबईच्या दिशेने जाणारा टाटा कंपनीचा ट्रक डुप्लिकेट नंबर प्लेट लावून गुरे वाहतूक करत होता. खारेपाटण चेक पोस्टवरील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी हा ट्रक तपासणीसाठी थांबवला. त्यावेळी ट्रकमध्ये गावठी गायी, बैल व वासरे अशी एकूण 19 पाळीव जनावरे आढळून आली होती. त्यावेळी ट्रक चालक व क्लीनर यांनी पाण्याचा प्रयत्न केला असता ट्रकचालकाला पोलिसांनी पकडले होते तर क्लीनर तिथून पसार झाला होता. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.