प्रवाशांना वाली कोण ? संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित …

आगारातील 16 एसटी बस गोवा मडगाव येथे रवाना अनेक प्रवासी फेऱ्या रद्द

देवगड, दि.५ फेब्रुवारी(गणेश आचरेकर)

देवगड आगारातून गोवा मडगाव येथे 16 एसटी बस गेल्यामुळे आगारातील बहुतांश फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक फेऱ्या रद्द झाल्यामुळे देवगड एसटी स्टँड मध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यातील प्रवाशांना वाली कोण ? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

देवगड आगारातून सोमवारी सकाळपासूनच एकूण 16 फेऱ्या रद्द करण्यात आला आहे. यामध्ये सकाळी ५.०० सुटणारी देवगड रत्नागिरी, ७.०० वाजता सुटणारी देवगड- पाडथर ,८.०० वाजता सुटणारी देवगड-रत्नागिरी ,8:20 ला सुटणारी देवगड-तांबर्डे फोंडा,९.०० वाजता सुटणारे देवगड-तुळजापूर 12:30 वाजता सुटणारी देवगड- सांगली 12:45 सुटणारी देवगड मिठबाव दु ३.३० मिनिटांनी सुटणारी देवगड- मोड हायस्कूल,३.३० देवगड- आचरा,३.१० देवगड नरसाळेवाडी,१५.३० देवगड-मालवण,३.४५ देवगड-कुली फोंडा,६.१० देवगड-वागदेवाडी,७.४५ देवगड-कातवण,४.३५ देवगड-गोवळ तसेच मालवण आगारातून येणारी ९.५० वाजता सुटणारी मालवण रत्नागिरी ही फेरी देखील बंद आहे. अचानक रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रासासह आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे अचानक अनेक फेऱ्या रद्द केल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचं प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे मात्र या अचानक फेऱ्या रद्द करणाऱ्या प्रशासनाला जाब कोण विचारणार का ? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.सदर फेऱ्या सोमवार मंगळवार दोन दिवस बंद राहणार आहेत