सायबर गुन्हे व आपली सामाजिक जबाबदारी यावर चर्चासत्र संपन्न

वेंगुर्ला,दि.६ डिसेंबर

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात वेंगुर्ला पोलीस ठाणे, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, जिमखाना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर गुन्हे आणि आपली सामाजिक जबाबदारी‘ याविषयावर चर्चा सत्र घेण्यात आले.
प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठी काळजीपूर्वक कसा करावा तसेच सायबर गुन्ह्यापासून कसे दूर राहावे याविषयी तर महिला हेड कॉन्स्टेबल रंजिता चव्हाण यांनी सायबर गुन्ह्यात अडकत जाणारे युवक व युवती, त्यांनी घ्यावयाच्या दक्षता तसेच तसेच सोशल मीडियाचा वापर कसा टाळला पाहिजे यावर तसेच महिला पोलिस नाईक सावी पाटील यांनी सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला अतिरिक्त वापर व त्यातून होणारे लैंगिक आकर्षण, निर्माण झालेल्या सामाजिक समस्या, त्यातून निर्माण झालेले गुन्हे या चक्रव्यूहात अडकत चाललेला युवक त्यांनी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. पोलिस कॉन्स्टेबल मनोज परूळेकर यांनी व्यसनाधीनतेत अडकत चाललेला युवक, नशामुक्तीसाठी त्यांनी करावयाची उपाययोजना, रस्ता सुरक्षा यावर मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन प्रा.जे.वाय.नाईक यांनी केले. प्रास्ताविक प्रा.विवेक चव्हाण यांनी तर आभार डॉ. सुनील भिसे यांनी मानले. यावेळी प्रा.वामन गावडे, डॉ. वसंतराव पाटोळे, डॉ. कमलेश कांबळे, डॉ.जी.पी.धुरी, डॉ.सचिन परुळकर, प्रा.बोडर्वेकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.