वेंगुर्ला,दि.६ डिसेंबर
येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलचे १९६४च्या बॅचचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मनोहर साबाजी गिरप यांच्या देणगीतून सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे देणगी दाखल दिले आहेत. याचे औपचारिक उद्घाटन माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी साईप्रसाद नाईक, प्रा. महेश बोवलेकर, प्रा.सुशांत धुरी, प्रा.सजय पोटफोडे, प्रा.विलास गोसावी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


