वेंगुर्ला,दि.६ डिसेंबर
रा.कृ.पाटकर हायस्कूलचे टेक्निकल विभागाचे ज्येष्ठ शिक्षक संजय पोटफोडे हे ३० नोव्हेंबर रोजी २३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीतून हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन निवृत्त प्राध्यापक बाबूराव खवणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. महेश बोवलेकर, प्रा.सुशांत धुरी यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


