बांद्यात शिवजयंतीनिमित्त भव्य चित्ररथ स्पर्धा

बांदा,दि.५ फेब्रुवारी
बांदा शिवप्रेमी मंडळाच्यावतीने दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. बांदा गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येत हा शिवजयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावर्षीही हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याने यासंदर्भात नियोजन करण्यासाठीची सभा श्री देवी भुमिका मंदिर येथे संपन्न झाली. यावर्षी या कार्यक्रमात मुख्य खास आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य खुली चित्ररथ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील चित्ररथ सामील होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी संघांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच लहान मुलांच्या वेशभुषा स्पर्धेत सुद्धा बक्षिसे देण्यात येणार आहे. सकाळी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर गडगेवाडी येथील शिवपुतळ्याकडून चित्ररथ व रॅली पुर्ण बांदा शहर व बांदेश्वर मंदिर पर्यंत काढण्यात येणार आहे, असे विविध कार्यक्रम यानिमित्ताने आयोजन करण्यात येणार आहेत.
या बैठकीत बांदा सरपंच प्रियांका नाईक, बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, बांदा मराठा समाज माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी उपसरपंच जावेद खातिब, ग्रा.पं.सदस्य रुपाली शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते पापु उर्फ निलेश कदम, राजेश सावंत, सर्वेश गोवेकर, फिरोज खान, हेमंत मोर्ये, बांदा मराठा समाज माजी खजिनदार राकेश परब, संजय सावंत, बांदा मराठा महिला समाज अध्यक्षा स्वाती सावंत, बांदा मराठा समाज समन्वयक लक्ष्मी सावंत, माजी पं समिती सदस्या राखी कळगुंटकर, दीक्षा सावंत, ममता सावंत, अस्मिता माजगावकर, शैलेश केसरकर, राकेश केसरकर जयप्रकाश सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अंतिम नियोजन करण्यासाठी गुरुवार दि. ८ फ्रेब्रुवारी रोजी सभा घेण्यात येणार आहे. या सभेत बांदा शिवप्रेमी यांची शिवजयंती उत्सव कमिटी तयार करण्यात येणार आहे तरी जास्त जास्त संख्येने या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.