सावंतवाडी,दि.०८ डिसेंबर
माडखोल खळणेवाडी येथे फुटलेला इन्सुलेटर बदलण्यासाठी खांबावर चढलेला मजूर कामगार शॉक लागून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरु असताना दीड तासातच त्याचा मृत्यू झाला. रूपेश अनंत डांगी ३० रा महादेवाचे केरवडे असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार वा घडली. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माडखोल खळणेवाडी येथे इन्सुलेटर फुटून त्या भागातील वीज प्रवाह खंडित झाला होता. तेथील तांत्रिक बिघाड दूर करून इन्सुलेटर बदलण्यासाठी यातील मजूर कामगार रूपेश डांगी हा खांबावर चढला होता तर खाली सहा कामगार थांबले होते. अचानक त्याला शॉक लागल्याने तो खांबावरून खाली पडून गंभीर जखमी झाला त्याला तातडीने उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्याच्यावर उपचार सुरु असताना दीड तासात त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच सहा पोलीस निरीक्षक संजय कांतीवले, पोलीस उपनिरीक्षक दडपसे, पोलीस प्रसाद कदम आदिनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वीज वितरण कंपनीचे ठेकेदार गौरेश सावंत यांच्याकडे मयत हा मजूर कामगार म्हणून कार्यरत होता. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक संजय कातिवले करत आहेत.
Home आपलं सिंधुदुर्ग फुटलेला इन्सुलेटर बदलण्यासाठी खांबावर चढलेला मजूर कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू