आगामी निवडणुकांमध्ये अल्पसंख्यांक समाज ठाकरेंच्या पाठीशी – मज्जिद बटवाले

शिवसेना उबाठा पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

कणकवली दि.५ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आम्ही भेट घेतली.त्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा भेटवस्तू म्हणून दिली.त्यांनी बघून आमचं कौतुक केले.त्यामुळे सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे आहेत.त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अल्पसंख्यांक मुस्लिम समाज ठाकरेंच्या पाठीशी राहणार आहे.लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाज मेळावा घेतला जाईल,अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष मज्जिद बटवाले यांनी दिली.

शिवसेना उबाठा पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी उपनेते गौरीशंकर खोत,विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते.यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है,शिवसेना झिंदाबाद..अशा घोषणा दिल्या.

मज्जिद बटवाले म्हणाले,ज्यावेळी गद्दारी झाली,तेव्हा वर्षा बंगल्यापासून ते मातोश्री पर्यंत साहेबांचा प्रवास झाला होता तो अजूनही आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. ज्या लोकांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विश्वासघात केला. त्यामुळे येणा-या निवडणूकीमध्ये त्यांना आम्ही भुईसपाट करणार आहे. आणि त्यामध्ये आमच्या अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा मोलाचा वाटा असेल. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बघण्याचे जे स्वप्न आहे,ते आम्ही २०२४ च्या निवडणूकीमध्ये पुर्ण करणार आहे. आमचा संपुर्ण जिल्ह्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये आम्ही अल्पसंख्यांक समाजाची योग्य ती बांधणी केलेली आहे.लवकरच जिल्ह्याचा मेळावा घेतला जाईल. पुर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज ठाकरेंच्या मागे आहे.आगामी निवडणूकीमध्ये आमचा संपुर्ण मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठीशी आहे हे दिसेल. आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बघण्याचे जे स्वप्न आहे ते आम्ही पुर्ण करणार असल्याचे मज्जिद बटवाले यांनी सांगितले.

अल्पसंख्यांक उपजिल्हा प्रमुख रियाज खान , सावंतवाडी तालुकाप्रमुख जावेद शहा , आचरा तालुकाप्रमुख झैफ काझी , निसार शेख, मालवण तालुका प्रमुख साजिद बंगी , फयाज खान , वेंगुर्ले तालुकाप्रमुख रफीक बेज , उपविभागप्रमुख गौस पाटणकर , तालुकाप्रमुख जावेद पाटणकर , इमाम नावलेकर, गवस बोबडे , अब्दूल नावलेकर, याकुब नावलेकर , अफजल बटवाले , रईस बटवाले , मुनफर बटवाले , महमंद साठविलकर , बटवाले मॅडम , साजिद बांगी आदींसह अल्पसंख्यांक बांधव उपस्थित होते.