वेंगुर्ला,दि.०९ डिसेंबर
डॉ.आंबेडकरांचे विचार माणसांचे जगणे समृद्ध करतात. म्हणूनच त्यांचे विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी एकसंघ होऊन समाजात वावरले पाहिजे, असे प्रतिपादन मठ सरपंच रूपाली नाईक यांनी केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मठ ग्ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच रूपाली नाईक, ग्रामसेवक विकास केळुसकर, ग्रामपंचायत सदस्य सोनिका मठकर, शमिका मठकर, संतोष वायंगणकर, नित्यानंद शेणई, प्रकाश बोवलेकर, श्री.बागायतकर तसेच सिद्धार्थनगर येथील उमेश मठकर, स्वप्नील मठकर, मिलिंद मठकर, मंदार मठकर, दत्तप्रसाद मठकर, यशश्री मठकर, मानसी मठकर, शिवाली मठकर आदी उपस्थित होते. महिलाच्या अधिकारांसाठी डॉ. बाबासाहेबांचे मोठे योगदान असल्याचेही सरपंच नाईक म्हणाल्या.