आंबोली कुडाळ बांदा येथील शासकीय विश्रामगृहासाठी दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन कार्यालयासाठी निधी मंजूर-महेंद्र केणी

सावंतवाडी,दि.५ फेब्रुवारी
आंबोली कुडाळ बांदा येथील शासकीय विश्रामगृहासाठी प्रत्येकी अडीच कोटी रुपये तर दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन कार्यालयासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम अभियंता महेंद्र केणी यांनी दिली.
सदर विश्रामगृह निर्लेखित करण्यात येणार आहे तर दोडामार्ग बांधकाम विभागाचे कार्यालय विश्रामगृह मागच्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे तेथे इमारत होण्याची मागणी होती ती आता पूर्णत्वास येणार आहे. संकेश्वर बांदा हायवेसाठी नांगरतास ते पाच किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसा प्रकारचे मागणी पत्र कोल्हापुर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे.
दरम्यान हा महामार्ग आंबोली माडखोल सावंतवाडी शहर इन्सुली असा जाणार आहे हा महामार्ग शहरातून जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु महामार्ग शहरातून जाण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नागपूर शक्तिपीठ गोवा महामार्ग, सागरी महामार्ग,ग्रीन फील महामार्ग एमएसआरडीएकडे आहे त्यामुळे याबाबत तेच सांगू शकतील असे केणी म्हणाले.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिलेल्या निवेदनाबाबत चौकशी करण्यात येईल आपल्या अखत्यारीतील जे विषय आहेत त्याची मी चौकशी करेल अन्य विषय वरिष्ठांकडे पाठवण्यात येतील असे केणी यानी स्पष्ट केले.