सावंतवाडी,दि.५ फेब्रुवारी
नुकत्याच सिंधुदुर्ग नगरी येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अधिकारी – कर्मचारी यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सावंतवाडी तालुक्याने अनेक क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन करुन सर्वसाधारण विजेतेपदास गवसणी घातली आहे.
यामध्ये मुख्यत्वे सांघीक पुरुष, महीला खोखो, लंगडी याचबरोबर विविध मैदानी पुरुष, महीला उंचउडी गोळाफेक ४०० मी. धावणे, कॅरम, बुध्दीबळ महीला व पुरुष त्याचबरोबर दिव्यांग महीला व पुरुष यामध्ये कॅरम, बॅडमिंटन, गोळा फेक, थाळीफेक अशा विविध क्रीडाप्रकारामध्ये उल्लेखनिय यश संपादन करत एकत्रीत जिल्हास्तरीय सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले व मानाचा चषक पटकावला यापुर्विही अनेकवेळा या तालुक्याने अशाचप्रकारे उल्लेखनिय यश संपादन करत विजेते तसेच उपविजेतेपद मिळविलेले आहे
यामध्ये सादंतवाडी तालुक्यातील प्राथ.शिक्षक, अंगणवाडी सेवीका मदतनीस आरोग्य कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी, अभियंता या सर्वानी विविध क्रीडा प्रकारामध्ये उस्फूर्तपणे भाग घेत आपले यशस्वी क्रीडाप्रदर्शन करीत विजयश्री खेचून आणणेसाठी मोलाचे सहकार्य लाभले गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देवून अभिनंदन केले.
Home आपलं सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सावंतवाडी तालुक्याची...