भाजपा किसान मोर्चाचे काम कौतुकास्पद – प्रभाकर सावंत

फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (FPO) कार्यशाळेचे आयोजन

कुडाळ,दि.५ फेब्रुवारी

शेतकरीवर्गाला आर्थिक सक्षम या एफपीओ मधून करता येईल त्याकरीता कार्यकर्त्यांनी ही एफपीओची धुरा हाती घ्यायला हवी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्तीत जास्त एफपीओ स्थापन होवून येथील स्थानिक उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचे सत्कर्म भाजपा किसान मोर्चाकडून घडत आहे.असे गौरवोद्गार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी काढले,भाजपा किसान मोर्चाने आयोजित केलेल्या FPO कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि वैविध्यपूर्ण शेती ही फक्त महाराष्ट्रातच होते, कित्येक वर्षे अनेक मुलभूत सेवासुविधाना वंचित असलेला शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या कालखंडात सुखावला आहे, भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांच्या पीकधारणेपासून ते पीकविम्यापर्यंत, शेतअवजरांपासुन ते घरकुल व मांगर योजनेपर्यंत अनेक योजनांवर लक्ष केंद्रित केले आहे.
या आधुनिक डिजिटल युगात शेतकऱ्यांना कंपनीधारक अर्थात मालक बनविण्याचा विडा उचलला आहे व त्याचेच पहिले पाऊल म्हणजेच एफपीओ (फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन) आणि याची सखोल माहिती देण्यासाठीच भारतीय जनता पार्टी – किसान मोर्चाने एफपीओ मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती
या कार्यशाळेत किसान मोर्चा पदाधिकाऱ्यांसह जे एफपीओ स्थापन करु इच्छित आहेत अशा नागरिकांनाही सहभागी केले होते,आज तरुणवर्ग शेतीकडे वळतोय त्यांना ही कार्यशाळा एक सुवर्णसंधी ठरेल.
2 फेब्रुवारीला भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.गणेश उर्फ तात्या भेगडे यांचा वाढदिवस व त्याचेच औचित्य साधून हा कार्यक्रम घेतला गेला.ही कार्यशाळा विनाशुल्क होती. सिंधुदुर्गनगरी,येथे ही कार्यशाळा संपन्न झाली
भाजपा जेष्ठ पदाधिकारी मा.श्री.रणजित देसाई यांनी एफपीओ उभारणीसाठी व विस्तारासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत हे सांगत या एफपीओ स्थापन करण्यासाठी येणाऱ्या अडचणीचेही निराकरण करु याची ग्वाही दिली.
किसान मोर्चाचे कार्याध्यक्ष मा.श्री.प्रसन्न देसाई यांनी एफपीओ स्थापन करु इच्छिणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. याकरिता शासकीय योजनाचे पुरेपूर सहकार्य मिळवून देण्याचे मान्य केले.
अध्यक्ष मा.श्री.उमेश सावंत यानी सिंधुदुर्गात लवकरच एफपीओचे जाळे निर्माण करण्याचे आश्‍वासन दिले.
या कार्यशाळेत
कंपनी स्थापना महत्व/रचना व कायदेशीर बाबी यावर श्री. वृषल शिंदे जिल्ह्यातील उत्पादन वस्तू संधी- यावर श्री.यशवंत (बापू ) पंडित
प्रोडक्टीव्ह एफपीओ व मार्केटिंग एफपीओ यामधील ताळमेळ यावर डाॅ. भाई बांदकर
एफपीओ रजिस्ट्रेशन व कायदेशीर बाबी – यावर ॲडव्होकेट सौ. धनश्री जोशी-आठलेकर कंपनीकरिता शासकीय योजना आणि बँक सहकार्य यावर डॉ आनंद तेंडुलकर कंपनीच्या व्यवस्थापनातील कायदेशीर व सीए व सीएस ची गरज या महत्वपूर्ण बाबीवर श्री.भूषण तेजम यांनी मार्गदर्शन केले
यामधून तीस एफपीओ स्थापन होतील अशी खात्री वाटते.
या कार्यशाळेची संकल्पना : डाॅ.भाई बांदकर यांची होती

नियोजन कृषी आयडॉल श्री.दादा सामंत,महेश सारंग,प्रसाद भोजने
गणेश सागवेकर यांनी केले
प्रस्तावना श्री. महेश संसारे व सूत्रसंचालन सौ.ज्योती देसाई यांनी केले तर आभार- श्री. गुरुनाथ पाटील यांनी मानले.