अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा येथे 11 डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुनील घस्ती यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ संपन्न

देवगड,दि.११ डिसेंबर

अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा येथे आज दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुनील घस्ती यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी मंचावर शाला समितीचे अध्यक्ष श्री.हर्षद जोशी, ज्येष्ठ शिक्षिका सौ स्मिता तेली उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत केल्यावर श्री.हर्षद जोशी यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व खेळाचे शारीरिक व मानसिकदृष्ट्या मानवी जीवनातील स्थान स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.घस्ती यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व खिलाडूवृत्ती अंगी जोपासावी असा संदेश दिला. यानंतर श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली.स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशालेच्या 1991 व 1997 च्या एसएससी बॅचने चषक व पदक यांचे प्रायोजकत्व घेतल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या स्पर्धेच्या वेळी क्रीडा शिक्षक श्री उत्तरेश्वर लाड, इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्था पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.भूषण दातार यांनी केले.