एसटी कर्मचा-यांचे सेवा शक्ती संघर्ष संघटनेत प्रवेश

वेंगुर्ला ,दि.५ फेब्रुवारी

वेंगुर्ला आगार सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या झालेल्या बैठकीवेळी सुमारे ३७ कर्मचा­-यांनी सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेत प्रवेश केला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामगारांचे प्रश्न या संघटनेच्या माध्यमातून सुटत आहेत. त्यामुळेच विविध संघटनेत असलेले कर्मचारी भाजपा प्रणित संघटनेत प्रवेश करीत असल्याचे सेवा शक्ती संघर्ष कामगार संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना देसाई सांगितले.

संघटनेत प्रवेश करणा-यांमध्ये स्वप्निल रजपूत, सेजल रजपूत, समिर कांबळी, वैभव मांजरेकर, आर.बी.बजरू, संजय मचे, शंभा सातजी, प्रकाश मोहिते, अक्षय येसाजी, संदिप माने, अनंत झोरे, मनोज दाभोलकर, विशाल पेडणेकर, राहूल आरोलकर, गौरव राणे, प्रकाश कराड, व्ही.आर.नलावडे, प्रविण रेवणकर, अर्चना कांबळी, एस.एच.परब, आर.पी.पालकर, आर.डी.केदार, के.एम.अनाहोसुर, एस.एस.शेख, संजय मेस्त्री, पंढरी झोरे, विकास बांदिवडेकर, पी.एल.चौगुले, पी.बी.कांबळे, एस.ए.रासम, एम.पी.सरमळकर, एस.टी.राऊळ, प्रमोद परूळेकर, एस.एस.कुरणे, साईनाथ दाभोलकर, डी.डब्लू. कोरगांवकर, सुमन गोसावी यांचा समावेश आहे. या सर्वांचे एस.टी.कर्मचा-यांचे नेते व कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी स्वागत करत ज्या विश्वासाने या संघटनेत प्रवेश केला, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम आपल्या संघटनेकडून होईल असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन व आभार विनायक दाभोलकर यांनी केले.