आचरा व्यापारी संघटना सत्यनारायण महापूजा अयोध्या मंदिर प्रतिकृती ठरतेय लक्षवेधी

आचरा,दि.५ फेब्रुवारी(अर्जुन बापर्डेकर)
आचरा व्यापारी संघटनेच्या वार्षिक सत्यनारायण महापूजेसाठी आचरा येथील युवकांनी उभारलेली अयोध्या येथील राममंदिराची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाआहे.
येथील योगेश बागवे, चंद्रकांत कदम, हेमंत गोवेकर, रूपेश पूजारे , निलेश पूजारे, प्रशांत सावंत,रामा मिराशी, सदा पूजारे हे युवक गेली काही वर्षे सत्यनारायण महापूजेची मखरे विनामोबदला सेवाभावी वृत्तीने आचरा आणि आचरेगावाबाहेरील भागात रात्री रात्री जागून उभारत आहेत . पुर्वी एक एकटे झटून हि मंडळी पूजेची मखरे बांधून देत होते.पण मागिल पाच वर्षांपासून एकत्रित पणे काम करत मखर बांधून देण्याची सेवा सुरू केली होती.यात स्वामी समर्थांची प्रतिकृती असो की रिक्षा,महल,मंदिर, चांदणी,गरुड अशा अनेक प्रतिकृती उभारत सार्वजनिक कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. २२जानेवारीला अयोध्येला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देश राममय झाला होता.आचरा येथील या कलाकारांनी व्यापारी मंडळाच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात सत्यनारायण पूजेसाठी राममंदिराची प्रतिकृती बनविण्याचा निश्चय करून अप्रतिम अशी राममंदिराची प्रतिकृती उभारली.यासाठी त्यांना समीर गांवकर, मुकेश सावंत, गिरीश माटवकर,शैलेश शेटये, शंकर गांवकर, प्रसाद गुरव,एकनाथ साटम, सिध्दार्थ कोळगे गणेश गोगटे.आबंशू बागवे, प्रफुल्ल नलावडे, आदींचे सहकार्य लाभले.सलग तेरातास काम करत उभारलेल्या राममंदिर प्रतिकृती बद्धल जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी तसेच आचराव्यापारी संघटनेकडून अभिनंदन करण्यात आले होते.