जनतेच्या हिताचे काम यापुढेही सुरु ठेवणार- वैभव नाईक

आचरा, पोईप, आडवली विभागातील कार्यकर्त्यांच्या मा.आ. वैभव नाईक यांनी घेतल्या गाठीभेटी

मालवण, दि.१२ डिसेंबर

मालवण तालुक्यातील आचरा, पोईप, आडवली या जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी दौरा करत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. विधानसभा निवडणूकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मला साथ दिली. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणे हे माझे कर्तव्य आहे.आणि जनतेच्या हिताचे काम यापुढेही सुरु ठेवणार असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोईप येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, विभागप्रमुख विजय पालव, भाऊ चव्हाण, पंकज वर्दम,रुपेश वर्दम,अमित भोगले, सिद्धेश मांजरेकर, बाबली पालव,गोविंद घाडीगावकर,निलेश पुजारे,आरती नाईक,नाना नेरकर,जयेश नार्वेकर, गणेश नेरुरकर,अक्षय नेरुरकर,श्री. मसुरकर,प्रमोद राणे,विकास परब,बाळा परब,दिपक मसदेकर,बबन परब आदी.


आचरा येथे उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, विभागप्रमुख समीर लब्दे, विनायक परब, विभाग संघटक मंगेश टेमकर,विभाग संघटक पप्पू परुळेकर, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर,उपविभाग प्रमुख अनिल गावकर,रविराज परब,नारायण कुबल, श्रीकांत बागवे,संजना रेडकर,सदानंद घाडी,हर्षद पाटील,दिलीप पुजारे,रंजन प्रभू, माणिक राणे आदी.
आडवली मालडी येथे विभागप्रमुख बंडू चव्हाण,बाबा सावंत,दुलाजी परब,जयराम परब, रामगड सरपंच शुभम मठकर,आडवली सरपंच श्री. आडवलकर, दिव्या धुरी,नम्रता मुद्राळे,साक्षी चव्हाण,अमित फोंडके,स्वप्नील पुजारे,सुभाष धुरी,हेमंत पारकर,विकास लाड,युवराज मेस्त्री,पंढरी घाडीगावकर,देवेंद्र पुजारे,आनंद तांबे,मनोज राऊत,सुभाष मांजरेकर,संजय पडवळ,बाळा सावंत आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.