निगुडे माऊलीचा 15 रोजी जत्रोत्सव

बांदा,दि.१३ डिसेंबर 
निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १५ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. सकाळी देवीची पूजा, ओटी भरणे कार्यक्रम, तसेच रात्री पालखी प्रदक्षिणा असे विविध कार्यक्रमाने जत्रोत्सव संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे रात्रौ आजगावकर दशावतर नाट्य मंडळचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.