महिला बचत गटाच्या सीआरपी बैठकीत राडा

नांदगाव,असलदे शिवाजीनगर येथील घटना;पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या सह पोलीस फौजफाटा घटनास्थळी धाव

कणकवली दि.१३ डिसेंबर

कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील सिआरपी यांची काहींनी तक्रार दाखल केली होती. यानंतर गेल्या तीन दिवसांपासून त्या सिआरपी चे तोंडवली बावशी ग्रुप ग्रामपंचायत येथे उपोषणाला बसल्या होत्या. कालच त्यांनी दुपारी उपोषण मागे घेतले आणि आज नांदगाव विभागातील बचत गट सिआरपी १५ व बचत गट ग्रामसंघ यांची नांदगाव असलदे शिवाजीनगर येथील एका दुकान गाळ्यात बैठक सुरू होती.
बैठक सरतेशेवटी तोंडवली येथील उपोषण केलेल्या सिआरपी यांचा विषय काहींनी काढला असता हा विषय फक्त तोंडवली गावापुरता आहे .यामुळे येथे हा विषय घेऊ नये असे सांगितले. त्यानंतर सिआरपी व काही महिलांमध्ये राडा झाला. राडा झाल्यानंतर लागलीच महिलांनी ११२ डायल करून याबाबत माहिती दिली.
तात्काळ घटनास्थळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक श्री.शेडगे, पोलीस हवालदार मिलिंद देसाई,पांढरे, पोलीस नाईक रुपेश गुरव ,पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने , राहुल राउत,किरण मेथे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा नांदोस्कर आदी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.याबाबत उशिरापर्यंत कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.