दोडामार्ग,दि.५ फेब्रुवारी
सोमवारी दुपारी दोडामार्ग तिलारी मार्गावर आवाडे येथे डंपर मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात दिलीप जयसिंग देसाई जखमी झाला आहे. त्याच्यावर साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून १०८ रुग्णवाहिकेने गोवा येथे हलविण्यात आले. साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिका असून डायव्हर नसल्याने रुग्णवाहिका मिळू शकली नाही त्यामुळे जखमीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मोटार सायकल मागे बसलेला सुरक्षा रक्षक याच्यावर साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत.