कळसुली येथील पंढरीनाथ चव्हाण याचे अल्पशा आजाराने निधन

कणकवली दि.५ फेब्रुवारी

ओरोस येथील जिल्हा परिषद कला क्रीडा विभाग कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि कणकवली तालुक्यातील कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी पंढरीनाथ राजाराम चव्हाण वय( ३०) याचे ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले,

त्याच्या पश्चात पत्नी, दोन महिन्यांचा मुलगा, आई,लहान भाऊ, काका,काकी असा परिवार आहे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण यांचे ते पुतणे होत. पंढरीनाथ चव्हाण हे मनमिळावू स्वभावामुळे परिचित होते.कला, क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रात पंढरीनाथ चव्हाण सहभागी होत असत.कळसुली येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.