समाजाच्या उन्नतीसाठी ग्रंथालय चळवळीचे योगदान महत्वपूर्ण-माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई

बदलत्या युगात ग्रंथालय चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी येणारे आधुनिक बदल स्वीकारणे क्रमप्राप्त

मालवण,दि.५ फेब्रुवारी

समाजाच्या उन्नतीसाठी ग्रंथालय चळवळीचे योगदान महत्वपूर्ण आहे. जिल्ह्यात शतकोत्तर वर्षे झालेली अनेक ग्रंथालये आजही दिमाखात वाचकांना सेवा देत आहेत. आजच्या बदलत्या युगात ग्रंथालय चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी येणारे आधुनिक बदल स्वीकारणे क्रमप्राप्त असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन येथील मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आज रणजित देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष धाकू तानवडे, रुजारिओ पिंटो, कार्यवाह राजन पांचाळ, सहकार्यवाह महेश बोवलेकर, विठ्ठल कदम, उदयराव मोरे, नागेश कदम, मेधा शेवडे, वैदेही जुवाटकर, नागेश कदम, प्रकाश कुशे, शैलेश खांडाळेकर, भरत गावडे, नाथा मडवळ, सतीश गावडे, ऋतुजा केळकर, मानसी दूधवडकर, अरविंद म्हापणकर, गजानन वालावलकर, प्रकाश कुशे, उदयराव मोरे, सुरेंद्र सकपाळ, प्रमोद ओरसकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी राजन पांचाळ यांनी प्रास्ताविक केले

यावेळी बोलताना रणजित देसाई यांनी ग्रंथालय कर्मचारी समस्यांसंदर्भात माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्हयातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि आवश्यक अनुदानासंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले तर मंगेश म्हसके यांनी ग्रंथालय चळवळीतील संस्था आणि त्यातील कर्मचारी हे अनेक अडचणींतून आपल्या संस्थांचे काम पाहत आहेत. याही पुढील काळात अनेक अडचणींतून ग्रंथालय चळवळ पुढे नेणे गरजेचे आहे. यासाठी वाचक टिकला पाहिजे, तरच आपण टिकणार आहोत. शासन यंत्रणांनी आतापर्यंत फक्त आश्वासने दिली आहेत. कामगारांना किमान वेतनानुसार मानधन मिळाले पाहिजे, यासाठी आता आमचा लढा सुरू आहे. आतापर्यंत अनेकांनी फक्त साथ केली मात्र निर्णय होण्यासाठी लढाच द्यावा लागला आहे. आताही आम्ही माजी खासदार नीलेश राणे यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी तयार आहोत. त्यांनी आमच्या समस्यांसाठी शासन स्तरावर प्रयत्न करावेत असे सांगितले

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी शासनाकडून ग्रंथालय कायद्यात दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. येत्या काळात ग्रंथालय चळवळ अधिक सक्षमपणे कार्यरत होण्यासाठी शासनस्तरावर निर्णय होण्याची शक्यता आहे. आता शासन निधी थेट ग्रंथालयांना मिळत आहे. याही पुढील काळात ग्रंथालयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

दुपारच्या सत्रात जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खुले – अधिवेशन झाले. त्यानंतर कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघातर्फे देण्यात येणारा आदर्श ग्रंथालय पुरस्कार माळगाव व वाडा ग्रंथालय यांना देऊन सन्मानित करण्यात आले. आंदर्श कार्यकर्ता पुरस्कार त्रिंबक वाचनालयाचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, करुळ ग्रंथालयाचे सचिव लक्ष्मण नारकर, आदर्श सेवक पुरस्कार कणकवली वाचनालयाचे राजन ठाकुर व मुणगे भगवती वाचनालयाचे विश्वास मुणगेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.