बांबर्डे येथे आढळून आलेल्या विषारी किंगक्रोब्रा सापाला रेस्क्यू करून वन अधिकारी यांच्या समक्ष आदिवासात सोडण्यात आले

दोडामार्ग, दि. १५ डिसेंबर 

जंगली हत्ती यांचे वास्तव्य असलेल्या बांबर्डे येथील राजाराम देसाई यांच्या घराच्या ठिकाणी रविवारी रात्री आढळून आलेल्या जहाल बारा फुटी विषारी किंग कोब्रा सापाला सर्पमित्र लाडू गवस यांनी रेस्क्यू करून. नंतर त्याला वन अधिकारी यांच्या समक्ष जंगलात आदिवसात
रात्री उशिरा सोडण्यात आले. दोडामार्ग तालुक्यात किंग कोब्रा यांची वाढती संख्या आता शेती काजू बागायती मध्ये जाणाऱ्या शेतकरी यांच्यात भिती निर्माण झाली आहे.

रविवारी रात्री
मा.उपवसंरक्षक सावंतवाडी श्री.नवकिशोर रेड्डी साहेब,मा.व सहाय्यक वनसंरक्षक श्री.सुनिल लाड साहेब, मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री वैभव बोराटे साहेब व मा. वनक्षेत्रपाल दोडामार्ग श्रीम.वैशाली मंडल मॅडम वनपाल कोनाळ श्री किशोर जंगले यांचे मार्गदर्शनाखाली मौजे बांबर्डे येथे सर्पमित्र श्री.लाडू गवस यांनी किंग कोब्रा नागास रेस्क्यू केले..
सदरचा किंग कोब्रा नाग मा.वनक्षेत्रपाल दोडामार्ग श्री.वैशाली मंडल मॅडम यांच्या समक्ष नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले…
यावेळी वनरक्षक बांबर्डे श्री शुभम वारके,वनरक्षक घोडगेवाडी श्री.मयुरेश करगुटकर,वनरक्षक तपासणी नाका कोनाळ श्री छाया लोहार,मदतनीस कोणाळ नितेश देसाई,विकास गवाळकर वाहन चालक संतोष शेटकर उपस्थित होते..
बांबर्डे येथील राजाराम विश्वासराव देसाई यांच्या ठिकाणी वन्यप्राणी
प्रजात – विषारी – किंगकोब्रा
लांबी – 12 फूट आढळून आला याची माहिती वन विभाग याना दिली . या नंतर टीम दाखल झाली.
सर्पमित्र – लाडू गवस यांनी यावेळी बारा फुटी किंग कोब्रा सापाला रेस्क्यू करून राञी उशिरा आदिवासात सोडण्यात आला.