तळेरे,दि. १६ डिसेंबर
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय कराटे स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या ६ खेळाडूंनी सुयश संपादक केले आहे.
ही स्पर्धा नृसिंहवाडी ता.शिरोळ जि . कोल्हापूर येथे नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेत २९ वर्षाखालील मुलींच्या गटात कु.दुर्वा प्रकाश पाटील हिने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
तर १९ वर्षाखालील मुलांच्या गटात कु.हर्षल योगेश कदम,कु.प्रिती शिवराज क्षीरसागर शुभम सुरेश राठोड , दुर्वास संजय पवार, व विघ्नेश संतोष पेडणेकर या सर्व खेळाडूंनी तृतीय क्रमांक पटकाविलेला आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,प्रा.देवेंद्र देवरुखकर,प्रा.दिवाकर पवार,सौ.पुजा पाताडे,प्रशिक्षक अभिजीत शेट्ये,साईप्रसाद बिजीतकर,बाळु जाधव आदींसह अन्य प्रशिक्षकाचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या गुणवंत खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ,मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार,
सरचिटणीस रोहिदास नकाशे,स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे ,स्कूल कमिटी पदाधिकारी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या प्राचार्य सौ बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस,क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, राहुल गायकवाड आदींने अभिनंदन केले आहे.
या यशस्वी कराटेपट्टूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.