कासार्डे विद्यालयाच्या मुलांच्या संघाची शालेय कोल्हापूर विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड…

प्रशालेचे दोन संघ उपविजेते तर तीन संघ तृतीय

तळेरे,दि. १६ डिसेंबर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने कुडाळ हायस्कूल येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
कासार्डे विद्यालयाच्या एकुण ६ संघाने जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यश संपादन केले आहे.तर १९वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे .या संघाची मिणचे ता.हातकलंगले जि.कोल्हापूर येथे १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेसाठी जिल्हातून निवड झाली आहे.
या यशस्वी संघात अजय पवार, अथर्व सावंत, ओमकार पवार, निहार तांबे, मंथन बिर्जे, यश रहाटे, अश्मेष लवेकर, दुर्गेश गोसावी, भूपेश सुतार, मयुरेश नारकर, विश्वास चव्हाण व सार्थक गुरव आदी खेळाडुंचा समावेश आहे.
उपविजेतेपद मिळविलेल्या 19 वर्षी मुलींच्या संघात कु.अक्षय झोरे, अस्मिता पवार, केळाबाई जाधव, दीक्षा पाताडे, प्रणाली कोकरे,लावण्या झोरे ,संजना चव्हाण,स्नेहल राठोड, दीक्षा बंदरकर, श्रुती मिसाळ, वैदेही देवरुखकर व कु.साक्षी पटकारे आदी खेळाडूंचा समावेश आहे.


तर दुसरे उपविजेतेपद पटकावलेल्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघात कु.आर्या तळेकर, गौरवी राणे, देवयानी सरवणकर, प्रसिद्धी जोशी, प्रीती क्षीरसागर, मधू प्रजापती, रिद्धी राणे, शिवानी जाधव, सुजाता राठोड, चित्रा तेली, सानिका चव्हाण व कु.वैष्णवी कातकर या खेळाडूंचा समावेश आहे.
या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळालेल्या १७ वर्षाखालील मुली संघ व मुलांच्या संघात तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या संघात ३६ खेळाडुंचा समावेश आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.दत्तात्रय मारकड,प्रा. देवेंद्र देवरुखकर,यशवंत परब,
सौ.वैष्णवी डंबे,श्रीम.डांगमोडे,श्रीम.पुजा पाताडे,प्रा. दिवाकर पवार आदी शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या गुणवंत खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,स्कूल कमिटी पदाधिकारी,पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सौ.बी.बी.बिसुरे , पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस, क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, राहुल गायकवाड आदींनी अभिनंदन करुन कोल्हापूर विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.