भाजपा जिल्हा चिटणीस संतोष कानडे यांनी दिल्या शुभेच्छा ; कणकवलीत लावलेले कटआऊट ठरताहेत लक्षवेधी
कणकवली,दि. १६ डिसेंबर
महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार आल्याने मंत्रींमंडळ विस्तारात कॅबिनेट पदाची शपथ रविवारी नितेश नारायण राणे यांनी घेतली. त्यानंतर कणकवली शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लागले आहेत. त्यातच 25 फुट उंचीचा मुंबई – पुणे – नागपूर या मेट्रो सिटी प्रमाणे कणकवलीत मंत्री नितेश राणे यांच्या शुभेच्छांचे कटआऊट भाजपा चिटणीस संतोष कानडे यांनी लावले आहेत. त्यामुळे हे शुभेच्छांचे कटआऊट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.