सिंधुदुर्ग,दि. १६ डिसेंबर
दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे -बांबर्डे येथील बागायतीत सर्पमित्र लाडू गवस यांनी तब्बल १२ फुटी किंग कोब्रा सापास रेस्क्यू करुन वन अधिकारी यांच्या समक्ष नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी सावंतवाडी उपवसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, दोडामार्ग वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, कोनाळ वनपाल किशोर जंगले ही उपस्थित होते.