महामार्गावर पावशी येथे दुचाकी-कार अपघात, दुचाकीस्वार जखमी

कुडाळ,दि.१६ डिसेंबर 

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे दुचाकी आणि कार यांच्यात संध्याकाळी ४.१५ च्या सुमारास अपघात झाला असून यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, दुचाकी (एमएच 07 AD 0578) ही कुडाळच्या दिशेने जात असताना पावशी येथे कारने दुचाकीला ओव्हरटेक करताना घावनळे कटिंग रोड येथे धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्यास दुखापत झाली असून त्याला ओरोस येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.