दळवी महाविद्यालयातील उडान महोत्सवाने विद्यार्थ्यांची मने जिंकली.

 तळेरे,दि.५ फेब्रुवारी

तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ‘उडान -२०२४ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.कुणाल जाधव,चेअरमन, एक्सटेंशन बोर्ड ऑफ स्टडीज, डॉ.राजेंद्र मुंबरकर,क्षेत्र समन्वयक, आजीवन अध्ययन विस्तार विभाग, मुंबई विद्यापीठ. श्रीपाद वेलिंग, प्र. संचालक सिंधुदुर्ग परिसर व समन्वयक दळवी महाविद्यालय. कवी अजय कांडर, डॉ.सई लळीत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलीत करत महाविद्यालय गीताने झाली. मा.हेमंत महाडिक सहा. प्राध्यापक,दळवी महाविद्यालय, या वेळी स्वागतपर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि,दळवी सरांमुळे महाविद्यालयात डीएलएलई उपक्रम सुरु झाला, दळवी डब्बा आईस स्पेस हा नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो असे सांगितले.

डॉ. कुणाल जाधव यांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व आजीवन अध्ययन विभागाची भूमिका यावर महत्वपूर्ण माहिती दिली. सामाजिक उपक्रमात सहभागी होणारा हा विभाग विद्यार्थी गुणांना संधी देणारा असून विद्यार्थांनी विविध स्पर्धांमधून सहभागी होऊन आपले कौशल्य विकसित केले पाहिजे असे ते म्हणाले.

श्रीपाद वेलींग यांनी आदर्श महाविद्यालयाची संकल्पना विषद केली. दळवी महाविद्यालय 2014 सुरू झाले, अत्यल्प फी मध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते, सध्या सात कोर्सेस शिकवीले जातात. असे ते म्हणाले.

सचिन टेकाळे यावेळी बोलतांना म्हणाले की, पुरोगामी विचार, सत्य पुढे घेवून जाणाराच खरा तरुण असतो. युगा युगाची वज्रा सारखी आव्हाने पेलणारा तो युवक असतो.

अजय कांडर म्हणाले कि,नाटक जपल गेल पाहिजे,आशय वगळून नाटक सादर होत नाही, पथनाट्य मनोरंजनाच्या मार्गाने न जाता प्रबोधनाच्या मार्गाने पुढे जाते.

डॉ.सई लळीत यांनी स्थानिक भाषेतून पथनाट्य सादर करावेत असे सांगितले.

या महोत्सवात जिल्ह्यातील १७ महाविद्यालयांतील सुमारे ४०० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पथनाट्य, पोस्टर स्पर्धा, पोवाडा, भाषण स्पर्धा, सृजनात्मक लेखन अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
यात पथनाट्य व सृजनात्मक लेखनस्पर्धेत, कणकवली कॉलेज कणकवलीने प्रथम क्रमांक मिळविला. पोवाडा गायन स्पर्धेत विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयानी प्रथम क्रमांक मिळविला. पोस्टर स्पर्धेत
संत राऊळ महाराज महविद्यालय,कुडाळ तर वकृत्व स्पर्धेत प्रमोद धुरी कॉलेज साळगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सहभागी व विजेत्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीश गुरव यांनी केले तर नरेश शेट्ये यांनी आभार मानले. यावेळी सर्वच विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.