तेरवण येथे आयोजित करण्यात आलेल्या बांबू हस्त कला प्रशिक्षण महीलांचा चांगला प्रतिसाद

दोडामार्ग, दि. १६ डिसेंबर

दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकाला एक चंदगड तालुक्यात सीमेवर वसलेल्या तेरवण गावात नुकतेच बांबू हस्त कला प्रशिक्षण प्रविण सोनावणे यांनी आयोजित केले होते. बांबू हस्त कला मधून महिलांना कसा रोजगार उपलब्ध होवू शकते याची माहिती यावेळी देण्यात आली. येथील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला अशी माहिती तेरवण शिवसेना शाखा प्रमुख विजय गवस यांनी दिली. पन्नास महिलांनी प्रशिक्षण घेतले.
बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था चिंचपल्ली चंद्रपूर कोकणमाथा फौंडेशन चंदगड यांच्या वतीने महाराष्ट्र शासन यांच्या वतीने हे आयोजन केले होते. गावातील लोकांना गावातच प्रशिक्षण दिले जाते. बांबू हस्त कला प्रशिक्षण माध्यमातून महिलांना कशा प्रकारे व्यवसाय सुरू करता येतो बांबू पासून बनणाऱ्या विविध वस्तू याना कशा प्रकारे मागणी आहे. याची माहिती दिली,
बांबू लागवड