दोडामार्ग, दि. १६ डिसेंबर
आपल्या नदी या खळाळणाऱ्या असतात त्यामुळे ‘कोंडी’ बुजल्या गेल्या साहजिक पाणी साठा एकत्र थांबत नाही. पूर्ण नदी गाळ काढण्याएवढा निधी ग्रामपंचायतकडे मिळणे अशक्य असते मात्र गावातील पाळीव जनावरांसाठी पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतने आपणास शक्य आहे एवढे पाऊल उचलले आहे याचाच भाग म्हणून बांधावरची नदी येथे मातीनाला बांध घालण्यात आला आणि पाणी साठवण करण्यात आली. याकामी युवक ओमकार देसाई यांनी स्वयंस्फूर्तीने काम केले याकामी ग्रामसेवक संदीप पाटील, सरपंच- रुक्मिणी मुकुंद नाईक, उपसरपंच – तेजस तुकाराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य – मेघना महादेव देसाई, गायत्री गणपत देसाई, यशवंत राजाराम देसाई, लक्ष्मण नाऊ घारे, प्रियंका मंगेश देसाई, लक्ष्मी नारायण धुरी यांसह ग्रामस्थ, युवक यांचे चांगले सहकार्य मिळाले.