देवगड,दि.१६ डिसेंबर (गणेश आचरेकर)
देवगड- जामसंडे वडांबानजीक असलेल्या साई पार्क कॉम्प्लेक्समधील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या २१ व्या दालनाचे भव्य उद्घाटन श्रीमती जयश्री जगन्नाथ पेडणेकर, आनंद पेडणेकर, आसावरी पेडणेकर, आदित्य पेडणेकर, सानिका पेडणेकर, रोमा पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दुपारी करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पेडणेकर ज्वेलर्सला भेट देऊन शुभेच्छा प्रदान केल्या. या नव्या दालनाच्या शुभारंभप्रसंगी ग्राहकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली.
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या या नव्या दालनाच्या शुभारंभप्रसंगी पेडणेकर ज्वेलर्सचे माजी आमदार ॲड. अजित गोगटे, ॲड. अभिषेक गोगटे, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, देवगड अर्बन बँकेचे अध्यक्ष सदाशिव ओगले, नगराध्यक्षा श्रीमती साक्षी प्रभू, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, भाजपचे देवगड मंडल प्रभारी संतोष किंजवडेकर, रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी- देवगडचे सचिव गौरव पारकर, रोटरी क्लबच्या अनुश्री पारकर, वेदा हॉलिडेज्चे व्यवस्थापक अनिकेत बांदिवडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पेडणेकर ज्वेलर्स दालनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटीच्यावतीने धनश्री पावसकर, वैष्णवी कदम यांनीही पेडणेकर ज्वेलर्स दालनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्वेलर्सचे व्यवस्थापक कमलेश व श्रीमती सिमरन आदी उपस्थित होते. दालनाच्या भव्य शुभारंभप्रसंगी ‘शिवगर्जना’ ढोलपथकाने सादर केलेले ढोलवादन लक्षवेधी ठरले होते.