दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मुख्य मार्गावर असलेल्या तिलारी फुलाच्या मध्यभागी पडला खड्डा…

खालील भाग दिसत असल्याने तातडीने दखल घेण्याची संदेश वरक यांची मागणी

दोडामार्ग,दि.१६ डिसेंबर

दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मुख्य मार्गावर तिलारी तेरवण मेढे नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या रस्त्यावर ज्या खांबावर पुलाचा भार आहे. अशा ठिकाणी एक भेग खड्डा पडला आहे. या खेड्यातून डोकावून पाहिले तर नदी पाञातील भाग दिसत आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी या ठिकाणी पडलेला खड्डा भेग याची दोडामार्ग बांधकाम विभाग यांनी पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना उबाठा कोनाळ विभाग पदाधिकारी संदेश वरक याने केली आहे.
दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मार्गावर तिलारी तेरवण मेढे नदीवर बांधलेले पुल याला बरीच वर्षे झाली आहे. हे पुल अरुंद आहे. याच पुलावर मध्यभागी एका खाबांवर दोन भाग जोडले आहेत. त्या ठिकाणी मध्यभागी खड्डा भेग पडली आहे. यातून डोकावून पाहिले तर नदी पाञातील भाग दिसत आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी संदेश वरक यांनी केली आहे. सोमवारी दुपारी हा खड्डा भेग पडल्याचे निदर्शनास आले.