सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी जिल्हाधिका-यांना दिले निवेदन
सिंधुदुर्ग,दि.१६ डिसेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री होत आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये टप-यांवर विषारी दारूची विक्री होत आहे. या विषारी दारूमुळे अनेकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाक्यानाकांवर विक्री होणारी विषारी दारु बंद करा अशी मागणी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे माजी सभापती , सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केली आहे.
सिंधुदुर्गामध्ये विषारी दारु बंद होणे आवश्यक आहे. विषारी दारु पिऊन मृत पावलेल्या लोकांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात यावे. विषारी दारु पिऊन आजारी पिऊन आजारी पडलेल्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत करावी. सध्या सिंधुदुर्गमध्ये माध्यमिक शाळा आणि कॉलेजच्या परिसरात सर्रास ड्रग्स , अफू, गांजा तसेच दारु याचे सेवन केले जात आहे. तरी माध्यमिक शाळा, कॉलेज या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी , गोव्यामधुन येणारी विषारी दारु ही जर पोलिस आणि एक्साईज यांना थांबविणे जमत नसेल तर आम्ही कार्यकर्ते थांबवण्यात सक्षम आहोत असा आदेश आपल्याकडून व्हावेत, अशी मागणी सुरेश सावंत यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. अन्यथा 30 दिवसा नंतर आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल , असा इशारा त्यांनी दिला आहे.