कणकवली,दि.१६ डिसेंबर
मंत्री म्हणून मी पहिल्यांदा विधिमंडळामध्ये पाऊल टाकलेला आहे. माझ्या पक्षाचे नेतृत्व आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार आणि सर्व वरिष्ठ प्रमुख नेत्यांनी माझ्यासारख्या तरुण आणि हिंदुत्वादी कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दिली.
महाराष्ट्र, कोकण आणि हिंदू समाज या सर्वांनाच पुढे घेऊन जाण्यासाठी आणि त्या सर्वांना ताकद देण्यासाठी , संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही 100 टक्के कशी प्रामाणिक पद्धतीने पार पाडता येईल, ह्या दृष्टिकोनातून माझी पावले टाकीन. 100 टक्के पदाला न्याय देण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न असणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
बॉक्स –
माझ्यावर जबाबदारी टाकलेल्या नेत्यांचे आभार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे आणि आ. रवींद्र चव्हाण आणि बाकी सर्व प्रमुख नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो की, माझ्यासारख्या युवा आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. या माध्यमातून हिंदुत्ववादी विचाराला मी अजून भक्कम करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्या सोबतच महाराष्ट्राचा विकास करेन, असा विश्वास नुतन कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.